दोन सामने हरलेल्या मुंबई इंडियन्स साठी अजून एक दुःखाची बातमी..

mi image

IPL2024 च्या 17 व्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स साठी फारशी समाधानकारक झालेली नाहीये कर्णधार हार्दिक पांड्या  (Hardik Pandya)  च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला .

पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स ने व दुसऱ्या सामन्यात सनराइज हैदराबाद ने खूप वाईट पद्धतीने मुंबई इंडियन्सला हरवल.

हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.

२० षटकात हैदराबादने ३ बाद २७७ धावा केल्या. क्लासेनने ३४ चेंडूत नाबाद ८० तर मार्करामने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या.

जागतिक ट्वेन्टी-२० प्रकारात फलंदाजीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवची उणीव मुंबई इंडियन्स संघाला जाणवत आहे. या आयपीएलमध्ये मुंबईने पंजाब संघाविरुद्धचा सामना अखेरच्या षटकांत चार धावांच्या फरकाने गमावला होता

पहिलेच मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आलेली आहे

 

 

 

मुंबई इंडियन्स व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमी अशी आहे की 360 असणाऱ्या सूर्यकुमार यादव पुढील आणखी काही सामने खेळू शकणार नाही

टी20 स्पेशलिस्ट असलेल्या सुर्यकुमार यादवची काही दिवसांपूर्वी स्पोर्ट्स हार्निया सर्जरी झाली होती. यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. फिटनेस टेस्टमध्येही सूर्यकुमार यादव पास होऊ शकला नव्हता. त्यामुळे एनसीएने सूर्यकुमार यादवला खेळण्याची परवानगी दिलेली नाही. पहिल्या दोन सामन्यात सुर्या खेळू शकला नव्हता. पण आता पुढच्या आणखी काही सामन्यातही त्याला खेळता येणार नाहीए. मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्यासाठी सूर्याला आणखी काही काळ लागणार आहे. पहिल्या दोन पराभवामुळे संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची प्रतीक्षा अजून वाढली आहे. या आयपीएलमध्ये अजून काही सामने तो खेळू शकणार नाही, असे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (एनसीए) सांगण्यात आले.

टीम इंडियाचा टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवची बादशाहत कायम राहिली आहे.

सूर्यकुमार यादव हा टी-२० मधील सर्वात विध्वंसक फलंदाज मानला जातो. तो एकाच चेंडूवर अनेकप्रकारे शॉट्स खेळू शकतो. त्याने ५३ सामन्यात १७२.७० च्या स्ट्राईक रेटने १८४१ धावा केल्या आहेत. तो केवळ १००० धावांच्या बाबतीतच नाही तर करिअरच्या स्ट्राइकरेटच्या बाबतीतही अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

एका डावात सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम

कोणत्याही टी-२० डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा भारतीय विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. त्याने १० जुलै २०२२ रोजी ११७ धावांची इनिंग खेळली होती. यादरम्यान १४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याने रोहित शर्माचा (वि. दक्षिण आफ्रिका, २०१५) १२ चौकारांचा विक्रम मोडला.

सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज

सूर्यकुमार यादव (३१ डाव) हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या वर फक्त विराट कोहली (२७ डाव) आणि केएल राहुल (२९ डाव) आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या

सूर्यकुमार यादवने २० नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध १११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने ५१ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकार ठोकले. टी-२० मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

UP
List of top-10 teams that lost the most matches in the history of ODI World Cup 16-year-old Pranjali Awasthi, owner of ai startup WHO CREATED HISTORY !! CRACKING IIT AT THE AGE OF 12 TOP 10 TOURIST PLACE IN AURANGBAD DO YOU KNOW FOUNDER OF DREAM 11 AND MARKETING STRATEGY